आजचे राशीभविष्य: १३ मार्च २०२६

मेष – अस्वास्थ्य व कटकटीचा अनुभव येईल. शरीरास आळस व थकवा जाणवेल तर मन अशांत राहील.

वृषभ – नवीन कार्याचा आरंभ शक्यतो टाळावा. स्वास्थ्य बिघडू शकते. खाण्या – पिण्याकडे विशेष लक्ष देणे हिताचे ठरेल.

मिथुन – शरीर व मन आनंदी राहील. कुटुंबीय व मित्र परिवार यांच्यासह एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल.

कर्क – आजचा दिवस व्यापार – व्यवसायात फायदा मिळवून देणारा आहे. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.

सिंह – आजचा दिवस नवनिर्माण व कला ह्या साठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासात प्रअनुकूलता लाभेल.

कन्या – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील.

तूळ – आजचा दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल.

वृश्चिक – आज आपणास जर कौटुंबिक वातावरणात शांतता हवी असेल तर वाणीवर संयम ठेवावा लागेल.

धनु – आज निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील.

मकर – आज मन अस्वस्थ राहील. एखाद्या मांगलिक किंवा सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च होईल.

कुंभ – आज आपणांस मिळणार्‍या फायदयामुळे आपला आनंद द्विगुणित होईल.

मीन – नोकरी – व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्यामुळे आपल्या मनाची प्रसन्नता वाढेल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 13-03-2026