गावखडी : रत्नागिरीत तालुक्यातील मेर्वी गुरववाडी जि.प.प्राथमिक शाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाल.
तसेच शाळा व्यवस्थापन अध्यक्षा सौ. दिप्ती पावसकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व श्री. रुपेश कुरतडकर तंटामुक्त समिती अध्यक्ष यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री.दिलीप गुरव (शाळा संस्थापक)यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळेच्या शैक्षणिक प्रगतीच्या चढत्या आलेखाबाबत समाधान व्यक्त केले आणि कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच शैक्षणिक प्रगतीबाबत शाळेचे *मुख्याध्यापक श्री मसरज शेख सर व श्री. सावंत सर सहशिक्षक यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. सत्यश्री खर्डे (अंगणवाडी सेविका), सौ. स्नेहा कुर्तडकर (मदतनीस) श्री. ओंकार शेठ खोत, श्री. शैलेश कुर्तडकर(पोलिस पाटील), सौ. अदिती गुरव, श्री. प्रसाद मेस्त्री, श्री. मनोज खर्डे, श्री. धीरज गुरव, श्री. प्रविण नागवेकर, श्री. मनोज खर्डे, श्री. अक्षय गुरव, श्रीमती शारदाताई गुरव, श्री. संकेत गुरव, श्री. संदीप पांडुरंग गोठणकर, श्री. अमोल कोंडवे, श्री. सुनिता कुर्तडकर(माजी सरपंच), श्री. दिगंबर गोठणकर, सौ. सृष्टी पेटकर, श्री. शैलेश खर्डे, श्री. नरेंद्र खर्डे, श्री. निलेश म्हादये यांनी सहकार्य तसेच रंगमंच व्यवस्था श्री नवलादेवी देवस्थान यांनी उपलब्ध केल्यामुळे मसरज शेख सर (मुख्याध्यापक) यांनी सर्व ग्रामस्थांचे व उपस्थितांचे शब्दसुमनाने आभार मानले आणि सर्व मुलांची रंगभूषा, वेशभूषा श्री. रविंद्र मेस्त्री यांनी केल्याबद्दल तसेच श्री. स्वप्निल नागवेकर यांनी ध्वज संकलन केल्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने श्री. सावंत सर यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:38 13-03-2026












