देवरुख : कसबा संगमेश्वर धर्मरक्षक छत्रपती संभाजी राजे समितीच्या वतीने कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ या घोषणेने कसबा दणाणून सोडले.
प्रतिवर्षीप्रमाणे कसबा संगमेश्वर येथे धर्मरक्षक छत्रपती संभाजी राजे धर्मरक्षण दिन समिती कसबा व भाजपतर्फे बलिदान दिनानिमित्त महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. सकाळी कसबा संगमेश्वर छत्रपती संभाजीप्रेमी आणि धर्मरक्षण दिन समितीच्या वतीने भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेवर अभिषेक करुन पूजा करण्यात आली. भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्याहस्ते धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.यावेळी छत्रपती संभाजी महाराज की जय , छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, वंदे मातरम आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. यानंतर समितीच्या वतीने आणि छत्रपती संभाजीप्रेमी आणि ग्रामस्थ यांनी महाआरती केली.
यावेळी संभाजी प्रेमिना संबोधित करताना माजी आमदार प्रमोद जठार यांनी कसबा या ठिकाणी छत्रपती संभाजी राजांचे स्मारक हे गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाच्या तोडीस तोड असे जगातील सर्वोत्कृष्ट त्यागाचे प्रतीक असे स्मारक उभारावे, अशी मागणी शासनाकडे केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या स्मारकासाठी 300 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रथम दर्शनी हे स्मारक पाच एकरमध्ये होणार असले तरी हे स्मारक भव्य दिव्य 100 एकरमध्ये व्हावे, अशी येथील प्रत्येक शंभूप्रेमींची इच्छा असल्याचे जठार यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते राजेंद्र महाडिक, सरचिटणीस डॉ.अमित ताठरे, तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, रुपेश कदम, सभापती शर्वरी वेल्ये , देवरुख नगराध्यक्ष मृणाल शेट्ये , सतीश पटेल , योगेश शिर्के , पंचायत समिती सदस्य बावा जड्यार, सौ.कोमल रहाटे, सुशांत मुळये , सुधीर यशवंतराव, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्निल सुर्वे, अनुप प्रसादे, रोशन पाष्टे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:38 13-03-2026













