रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने प्रायोजित केलेली खल्वायन रत्नागिरी या संस्थेची, गेली २७ वर्षे सातत्याने होणारी दिवाळी पाडवा विशेष संगीत मैफल यावर्षी शनिवार, दि. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गुरुकृपा मंगल कार्यालय, पऱ्याची आळी, बाजारपेठ, रत्नागिरी येथे आयोजित केलेली आहे. चिपळूणचे कोकण गंधर्व राजाराम श्रीराम ऊर्फ राजाभाऊ शेंबेकर यांच्या भक्ती भाव नाट्यसंगीत गायनाने ही मैफल रंगणार आहे.
या मैफलीला तबला साथ हेरंब जोगळेकर, हार्मोनियम, ऑर्गन साथ श्रीरंग जोगळेकर, पखवाज साथ मंगेश चव्हाण, व्हायोलिन साथ उदय गोखले तर तालवाद्य साथ सुहास सोहनी ही रत्नागिरीच्या कलाक्षेत्रातील नामवंत मंडळी साथ संगत करणार आहेत. ही मैफल विनाशुल्क असून, सर्व रसिक श्रोत्यांनी या मैफलीला उपस्थित राहून गायन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्था अध्यक्ष मनोहर जोशी आणि त्यांचे सहकारी यांनी केले आहे.
खल्वायन च्या पुढील ३०७ व्या मासिक संगीत सभेत शनिवार दि. ९ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द गायिका श्रृती बुजरबरुआ यांचे गायन होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 31/Oct/2024














