IDBI बँकेत ११०० पदांची मेगा भरती! ‘ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर’ पदासाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची पद्धत

IDBI Bank Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी आयडीबीआय बँकेने (IDBI Bank Ltd.) ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (JAM) – ग्रेड “O” पदासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे देशभरातील विविध शाखांमध्ये ११०० रिक्त पदे भरली जाणार आहेत.

आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

पदाचे नाव आणि रिक्त जागा

  • पदाचे नाव: ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (Junior Assistant Manager – Grade ‘O’)
  • एकूण रिक्त पदे: ११०० जागा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Bachelor’s Degree) पूर्ण केलेली असावी.

  • खुला प्रवर्ग/EWS/OBC: किमान ६०% गुणांसह पदवी उत्तीर्ण.
  • SC/ST/PwBD प्रवर्ग: किमान ५५% गुणांसह पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा (Age Criteria)

वयाची गणना नियमानुसार केली जाईल. विविध प्रवर्गांसाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे:

प्रवर्गवयोमर्यादा
खुला प्रवर्ग (General)२० ते २५ वर्षे
OBC (Non-Creamy Layer)२० ते २८ वर्षे
SC/ST२० ते ३० वर्षे
अपंग (PwBD)१० वर्षे शिथिलता
माजी सैनिक (Ex-Servicemen)५ वर्षे शिथिलता

अर्ज शुल्क (Application Fee)

  • SC/ST/PwBD प्रवर्ग: ₹२५०/-
  • इतर सर्व प्रवर्ग (General/OBC/EWS): ₹१०५०/-

निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

आयडीबीआय बँकेतील या पदासाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या आधारे केली जाईल.

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: १९ मार्च २०२६
  • ऑनलाइन परीक्षेची संभाव्य तारीख: १२ एप्रिल २०२६

अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवारांनी IDBI बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Careers’ सेक्शनमध्ये ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना (Official Notification) काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Officail Notification: Click Here


बँकिंग करिअरसाठी उत्तम संधी

आयडीबीआय बँक ही देशातील अग्रगण्य बँकांपैकी एक असून, ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर म्हणून करिअरची सुरुवात करणे ही तरुणांसाठी मोठी संधी आहे. अर्ज प्रक्रिया लवकरच संपणार असल्याने पात्र उमेदवारांनी वेळेत आपले अर्ज सादर करावेत.