चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण १२ जणांनी १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी झालेल्या अर्जाच्या छाननीत ४ अर्ज अवैध ठरले आहेत. त्यानुसार एकूण ८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून यातील कोण-कोणते उमेदवार माघार घेणार, याकडे लक्ष लागलेले आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसमधून शेखर गोविंदराव निकम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षातून प्रशांत बबन यादव, यांच्यासह अपक्ष म्हणून अनघा राजेश कांगणे, नसिरा अब्दुल रहमान काझी, प्रशांत भगवान यादव, महेंद्र जयराम पवार, शेखर गंगाराम निकम आणि सुनील शांताराम खंडागळे या ८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. येथील प्रांताधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत स्वप्ना प्रशांत यादव, सुनील हरिश्चंद्र वेतोसकर, अमित रोहिदास पवार, संतोष पांडुरंग शिंदे यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 31/Oct/2024














