रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अॅड. मांडवकर संस्थापक नीलेश सांबरे यांनी अॅड. महेंद्र मांडवकर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
जिजाऊ संस्थेचे काम जिह्यामध्ये जोमाने सुरू राहील व भविष्यात आवश्यकता भासल्यास लोकांना राजकीय पर्याय म्हणून देखील संस्था काम करेल, असा विश्वास नुतन जिल्हाध्यक्ष अॅड. मांडवकर यांनी व्यक्त केला.
संस्थेचे जिल्हाध्यक्ष असलेले प्रथमेश गावणकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे संस्थेच्या रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदी अॅड. महेंद्र मांडवकर यांची निवड केली. जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कार्यकर्त्यांची रत्नागिरीत बुधवारी तातडीने बैठक घेतली. या वेळी तालुकाध्यक्ष मंदार नैकर, अक्षय बारगुडे, दीपक सांबरे, सिद्धेश रांबाडे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 31-10-2024














