पाली पंचक्रोशी बौद्ध समाज मंडळ या मंडळाचे अथक प्रयत्नातून समाज कल्याण विभागाच्या निधीतूनउभारलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचे हस्ते पूज्य भंते कश्यप थेरो व धम्म सेना थेरो यांचे समवेत करण्यात आला. या सोहळ्यास पाली पंचक्रोशीतील व तालुक्यातील बौद्ध जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
सकाळी ९.३० वाजता पंचक्रोशीचे अध्यक्ष आयु.विठ्ठल सावंत यांचे हस्ते मान्यवर व कार्यकारणी सदस्य पदाधिकारी यांचे उपस्थितीत धम्म ध्वजारोहण करण्यात आले भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची नाणीज येथून भव्य रॅली पाली बौद्धवाडीतून बाजारपेठेतून स्मारकापर्यंत काढण्यात आली.
पूज्य भंते कश्यप थेरो व धम्म सेना थेरो यांचे हस्ते व पदाधिकारी व पंचक्रोशीतील बौद्धाचार्य त्यांचे समवेत बुद्ध मूर्तीची व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली पूजा पाठ झाले नंतर उपस्थित जनसमुदायास आदरणीय भंते यांनी धम्मदेशना दिली. स्नेहभोजनानंतर पाली पंचक्रोशीतील सांस्कृतिक कला मंच या मंडळाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या व रमाईच्या जीवनावर धम्म गीते सादर केली त्याला उपस्थितांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला एक मे १९५७ रोजी पंचक्रोशीतील धम्मदीक्षा घेतलेल्या बुजुर्ग बांधवांचा मंडळाचे वतीने सन्मान करण्यात आला तसेच दीक्षाभूमीची जागा स्मारकासाठी मिळावी म्हणून पूर्वी पंचक्रोशीतील समाज बांधवांनीप्रयत्न केले त्यांचाही नामोल्लेख करण्यात आला.
पालकमंत्री उदय सामंत यांनी मान्यवरांचे उपस्थितीत उद्घाटन केल्याचे जाहीर केले कार्यक्रमाचे सभेत रूपांतर झाले नंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना सर्व समाजाने एकत्र यावे एकत्र आल्यानेच आपला विकास होऊ शकतो.
या कार्यक्रमाला सभापती रत्नागिरी प्रवीण पांचाळ, उपसभापती धनावडे, तालुकाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य बाबु म्हाप, जिल्हा परिषद सदस्य सुयोग कांबळे, पंचायत समिती समिती सदस्य व पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील, पंचायत समिती सदस्य डॉक्टर पद्मजा कांबळे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपभियंता धोत्रेकर , शाखा अभियंता पवल, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण दीपक घाटे आणि मान्यवर हजर होते. या सर्वांचे मंडळाच्या वतीने स्वागत व सन्मान करण्यात आला.
या स्मारकामध्ये बुद्ध मूर्ती आयुष्यमान संजय कांबळे डॉक्टर बाबासाहेबांची मूर्ती पाली पंचक्रोशीतील महिला मंडळांनी धम्मदान दिली. तसेच वाचनालयासाठी पुस्तके तक्षशिला पतपेढीने दिली त्यांचे अध्यक्ष नितीन कांबळे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या स्मारकाचे ठेकेदार पराग सावंत यांनी इमारतीचे उत्कृष्ट बांधकाम केले त्याचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.बेटकर गुरुजी यांनी केले व प्रास्ताविक सल्लागार आयु. एमबी कांबळे यांनी केले. उद्घाटन सोहळा यशस्वी करण्या साठी पाली पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्ते महिला मंडळ तरुण वर्ग यांनी मोलाचे सहकार्य व योगदान दिले. सांस्कृतिक कार्यक्रमामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारे कलाकार त्यांचे प्रमुख यांना मंडळाचे वतीने धन्यवाद देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:44 16-03-2026














