Ratnagiri Accident: जांभूळ फाटा परिसरात दोन मोटारींचा भीषण अपघात

रत्नागिरी: शहरालगत असलेल्या जांभूळ फाटा धार आणि मिरजोळे धार परिसरात दोन कारचा अपघात झाला असून, एका मोटार चालकाने दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी (७ मार्च २०२६) दुपारी अडीचच्या सुमारास जांभूळ फाटा धार ते मिरजोळे धार दरम्यानच्या रस्त्यावर घडला. शुभम शिवाजी सनगरे हे आपली मोटार (क्र. MH-08 AX 0151) घेऊन रत्नागिरीकडून मजगावकडे जात होते.

त्याच वेळी रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या दुसऱ्या मोटारीने (क्र. MH-43 CM 5468) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

संशयित चालकावर कारवाई

या अपघात प्रकरणी अभिनय रवींद्र साळवी (वय ५०, रा. टेंभ्ये, रत्नागिरी) या संशयित चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र सावंत यांनी शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली होती.

तपासाची सद्यस्थिती: रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. वेगावर नियंत्रण नसल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:14 17-03-2026