देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील लोवले स्वामी समर्थ मठ येथे भात पिकांचे उत्पादनाचे निरीक्षण करण्यात आले. यात आशिष भिडे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
किसान क्राफ्ट कंपनी बंगळूरचे बियाणे नमुन्याकरता शेतकऱ्यांना अभय शेट्ये यांच्यामार्फत वितरित करण्यात आले होते. यानुसार शेतकऱ्यांनी याची पेरणी केली होती. यात द्वितीय अनंत (आप्पा) पाध्ये (गोळवली) व तृतीय शांताराम जाधव (शिवणे) यांनी मिळवला. आशिष भिडे यांनी लावलेल्या एसडीएसआर १००७ ही भात पीक जात १२५ ते १३० दिवसांत कापण्यात आली. त्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसोबत घेण्यात आले. कार्यक्रमामध्ये शेतकरी बांधवांना किसनक्राफ्ट फाऊंडेशन मार्फत उत्तेजनार्थ बक्षीस वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला कृषी अधिकारी, पत्रकार व शेतकरी यांची उपस्थिती लाभली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 31/Oct/2024














