राजापूर: प्रभाग नऊ मधील विकासकामांना मंजुरी

राजापूर : राजापूर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक नऊ मधील विविध विकास कामांना शासनाच्या नगरोत्थान व नागरी सुविधा अंतर्गत निधी प्राप्त झाला आहे. या कामांची निवीदा प्रक्रिया पुर्ण झाली असूनत लवकरच ही कामे सुरू होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय ओगले यांनी दिली आहे.

राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री व रत्नागिरचे पालकमंत्री ना. उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असल्याचे ओगले यांनी सांगितले.

नगर परिषद निवडणूकीपुर्वी आपण आ. किरण सामंत यांच्या मार्फत पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे ही कामाची यादी दिली होती व ती त्यांनी मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे या भागातील विकासाला गती मिळणार असल्याचे ओगले यांनी सांगितले.

यामध्ये राजापूर दिवटेवाडी येथील राजेश मुळम यांच्या घराजवळ चिरेबंदी चिंत बांधणे ५ लाख, दिवटेवाडी कुळी घर ते रामा पिठलेकर घर रस्ता रुंदीकरण करुन संरक्षण भिंत बांधणे २० लाख , प्रभाग क. ८ कोंडसकर घर ते चव्हाटा आणि मराठे घर दिवटेवाडी रस्सा काँक्रीटीकरण करणे ९ लाख ९७ हजार, कुंभारमळा ते नदीपात्रापर्यंत संरक्षक भिंत बांधणे १९ लाख १५ हजार दिवटेवाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता रुंदीकरण करणे १० लाख ४६०००, दिवटेवाडी स्मशानभूमी येथे संरक्षक भिंत बांधणे ९ लाख ७३ हजार, गुजराळी येथे कलावती आई (नियोजित) मंदिर येथे रस्ता रुंदीकरण करुन संरक्षक भिंत बांधणे ९ लाख ९२ हजार, कलावती आई मंदिर येथे सोलर हायमास्ट बसविणे ७ लाख, गोंडाळ चौक येथे सुसोभिकरण करणे ४ लाख ९८ हजार, लक्ष्मीनारायण मंदिर येथे सोलर हायमास्ट बसविणे ७ लाख, बागकाझी कब्रस्तान सुशोभिकरण करणे १९ लाख ९५ हजार तांबळघाटी ते न.प. हद्दीपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ९ लाख ७९ हजार, श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर गुजराळी वहाळावर आर.सी.सी. पुल बांधणे ११ लाख ६९ हजार कोठारकर तिठ्यावर सोलर हायमास्क बसविणे ७ लाख ४२ हजार असा निधी प्राप्त झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:48 18-03-2026