रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता नियुक्त निरीक्षक भेटीसाठी उपलब्ध

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये २६३-दापोली, २६४- गुहागर विधानसभा मतदार संघासाठी सुमित जरांगल हे सामान्य निवडणूक निरीक्षक आणि २६५ चिपळूण, २६६-रत्नागिरी, २६७- राजापूर विधानसभा मतदार संघासाठी जनक प्रसाद पाठक हे सामान्य निवडणूक निरीक्षक तसेच सर्व विधानसभा मतदार संघासाठी पुरुषोत्तम कुमार हे खर्च निरीक्षक, राजेंद्र प्रसाद मीना हे पोलीस निरीक्षक म्हणून दाखल झाले आहेत. उमेदवार, राजकीय पक्ष, प्रतिनिधी व नागरिक यांच्या भेटीसाठी सकाळी १० ते ११ या वेळेत हे निरीक्षक उपलब्ध असणार आहेत.

दापोली, गुहागर विधानसभा मतदार संघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक सुमित के जरांगल संपर्क क्रमांक ८१४९२७७९८९, ठिकाण – शासकीय विश्रामगृह, माळनाका, रत्नागिरी. चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदार संघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक जनक प्रसाद पाठक संपर्क क्रमांक ठिकाण -७८२३०१२२६७, शासकीय विश्रामगृह, – माळनाका रत्नागिरी पुरुषोत्तम कुमार सर्व विधानसभा मतदार संघासाठी खर्च निरीक्षक – संपर्क क्रमांक ८१४९४६७६५०, ठिकाण माळनाका, शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी. सर्व विधानसभा मतदार संघासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रसाद मीना संपर्क क्रमांक ९३०७९६२२८५, ठिकाण शासकीय विश्रामगृह, माळनाका, रत्नागिरी येथे उपलब्ध आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 31/Oct/2024