रत्नागिरी : माजी सैनिक जिल्हास्तरीय संरक्षण समितीची आज बैठक

रत्नागिरी : माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली आज, शुक्रवारी, दि. 20 मार्च रोजी दुपारी 12 वा.पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.

ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संरक्षणासंदर्भात तक्रारी असतील, त्यांनी बैठकीस आपला अर्ज व संबंधित कागदपत्रासह विहित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 20-03-2026