खेड : रामेश्वर आयटीआयमध्ये कौशल्य पदवीदान समारंभ

खेड : खेड दाभिळ येथील श्री रामेश्वर शिक्षण संस्था संचालित अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही सप्टेंबर २०२३ मध्ये स्थापन झाली. या संस्थेत इलेक्ट्रिशियन, फिटर आणि कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट हे व्यवसाय आहेत. यातील एक वर्षाचा COPA व्यवसायाचा २०२४ मध्ये झालेल्या अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेत शंभर टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत प्रथम क्रमांक तंजीला इस्माईल नेवरेकर ७८ टक्के, द्वितीय क्रमांक महेक इस्माईल नेवरेकर ७७ टक्के आणि तृतीय क्रमांक हर्षणी हिरामण मोहिते ७६ टक्के गुण मिळून यशस्वी झाले. या यशस्वी प्रशिक्षणार्थीचा SCON या कंपनीचे प्रकल्प संचालक अविनाश भिंगारदिवे यांचे हस्ते मेडल आणि प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी आयटीआयचे प्राचार्य मकरंद ढोकळे, सहकारी शिक्षक प्रशांत रायकर, उमेश नाचरे, साक्षी तांबे, शीतल मोहिते कंपनीचे एच. आर. विभागातील दिनेश म्हादलेकर, पालक हिरामण मोहिते, इस्माईल नेवरेकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 31/Oct/2024