खेड: शहरातील गजबजलेल्या गांधी चौक परिसरात रस्त्याच्या मध्यभागी वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी एका वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाजारपेठेत विनाकारण अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे प्रकरण? मंगळवारी (१७ मार्च २०२६) सकाळी ११:५० वाजण्याच्या सुमारास खेड बाजारपेठेतील ‘आपला बाजार’ समोर ही घटना घडली. आरोपी गणेश मारुती महाडीक (वय ५०, रा. बिरवाडी, ता. महाड) याने आपल्या ताब्यातील एमएच-०६-बीडब्ल्यू-९८०४ क्रमांकाची गाडी गांधी चौक येथील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी उभी करून ठेवली होती.
पोलिसांची कारवाई: रस्त्याच्या मध्यभागी गाडी उभी असल्याने इतर वाहनांना आणि पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते, तसेच यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलीस कर्मचारी तेजस्वीनी उमेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:58 20-03-2026














