Ratnagiri : डीजीके-कीर विधी महाविद्यालयात सामंजस्य करार

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव, घैसास, कीर, कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय आणि श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयात शैक्षणिक, संशोधनात्मक व सहशैक्षणिक उपक्रमांच्या देवाणघेवाणीसाठी तीन वर्षांच्या कालावधीचा सामंजस्य करार करण्यात आला.

या करारामुळे दोन्ही महाविद्यालयांतील शिक्षक व विद्यार्थ्यांना संयुक्त व्याख्याने, कार्यशाळा, परिसंवाद, संशोधन उपक्रम तसेच विविध प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे शैक्षणिक सहकार्याची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक कार्यक्रमांचे संयुक्त आयोजन करण्यात येणार आहे.

या सामंजस्य करारावर देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील तसेच श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आशीष बर्वे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी उपप्राचार्या व सामंजस्य करार विभागाच्या प्रमुख प्रा. वसुंधरा जाधव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. राखी जाधव उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे दोन्ही महाविद्यालयांतील शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:58 20-03-2026