कोकण रेल्वे मार्गावर ‘वनवे स्पेशल’ धावणार

कुडाळ, कणकवलीसह रत्नागिरी, चिपळूणला थांबे

रत्नागिरी : दिवाळी सणामुळे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गे मडगाव जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी वन- वे स्पेशल गाडी दि. १ नोव्हेंबर २०२४ रोजी धावणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मडगाव जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (०२०५२) ही एक मार्गी विशेष गाडी दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता मडगाव जंक्शनवरून सुटेल आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ती त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. ही वनवे स्पेशल गाडी थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण रोहा, पनवेल या स्थानकांवर थांबे घेणार आहे. या स्पेशल गाडीला सध्या कोकण रेल्वे मार्गावर धावत असलेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसप्रमाणे एक विस्टा डोम कोच, एसीचे चेअर कार ३, सेकंड सेटिंगचे १० डबे तसेच जनरेटर कार व एस. एल. आर. चा प्रत्येकी एक असे एकूण १६ डबे जोडण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 31/Oct/2024