खेड: खेड नगरपालिकेचे २०२५-२६ चे सुधारित आणि २०२६-२७ चे अंदाजित अंदाजपत्रक नुकत्याच झालेल्या सभेत मंजूर करण्यात आले. नगराध्यक्षा माधवी बुटाला यांनी हे अंदाजपत्रक सभागृहात मांडले, ज्याला सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली. या अंदाजपत्रकात १२ लाख ७४ हजार रुपयांची शिल्लक दर्शवण्यात आली आहे.
अंदाजपत्रकाची ठळक वैशिष्ट्ये:
- एकूण संभाव्य जमा (२०२६-२७): १६ कोटी ५५ लाख १ हजार ५०६ रुपये.
- एकूण संभाव्य खर्च (२०२६-२७): १६ कोटी ४२ लाख २७ हजार ३९ रुपये.
- शिल्लक रक्कम: १२ लाख ७४ हजार ४६७ रुपये.
मोठ्या योजनांमुळे उत्पन्नात वाढ
नगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना, टीपी स्कीम आणि नागरी सेवा-सुविधांच्या मोठ्या योजनांना मंजुरी मिळाल्यामुळे अंदाजपत्रकामध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील तीन वर्षांत मोठी योजना मंजूर नसल्याने आणि प्रशासकीय काळात विकास योजनांना खीळ बसली होती, मात्र आता नगरसेवक या तरतुदीनुसार विकासकामे करण्यावर भर देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नियम ४२५ नुसार, १ कोटीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या नगर परिषदेला किमान शिल्लक ठेवणे आवश्यक असते, त्या नियमांचे पालन या बजेटमध्ये करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 21-03-2026














