कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘देसाई बंधू आंबेवाले’ यांची १००% नैसर्गिक पेये बाजारात; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अनावरण

रत्नागिरी : कोकणचा राजा मानल्या जाणाऱ्या हापूस आंब्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या पावस येथील ‘देसाई बंधू आंबेवाले’ यांनी प्रक्रिया उद्योगात मोठी भरारी घेतली आहे. ग्राहकांसाठी कोणतीही रसायने नसलेली १००% नैसर्गिक फळांची रसाळ पेये (Drinks) देसाई बंधूंनी बाजारात आणली असून, या नवीन उत्पादनांचे दिमाखदार अनावरण राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले.

याप्रसंगी देसाई बंधू परिवारातील आनंद देसाई, अमर देसाई, रोहन देसाई आणि सुदेश मयेकर उपस्थित होते. ही उत्पादने केवळ स्थानिक बाजारपेठेतच नव्हे, तर थेट अमेरिकेसारख्या (USA) प्रगत राष्ट्रात निर्यात होणार असल्याने कोकणी ब्रँडचा डंका आता सातासमुद्रापार वाजणार आहे.

केमिकलमुक्त आणि आरोग्यासाठी सुरक्षित

आजच्या काळात शीतपेयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि रंगांचा वापर केला जातो. मात्र, देसाई बंधूंनी आपली परंपरा जपत या नवीन उत्पादनांमध्ये:

  • No Preservatives (कोणतीही टिकवून ठेवणारी रसायने नाहीत)
  • No Additives (अतिरिक्त घटक नाहीत)
  • No Artificial Colour (कृत्रिम रंग नाही)
  • No Chemicals (१००% नैसर्गिक) अशा वैशिष्ट्यांसह ही पेये तयार केली आहेत.

अशी आहेत नवीन उत्पादने आणि त्यांच्या किमती:

देसाई बंधूंनी प्रामुख्याने चार प्रकारची पेये लाँच केली असून ती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत:

  1. Plain Alphonso Mango Drink: ५० रुपये (MRP)
  2. Alphonso Mango Drink with Tidbits: ६० रुपये (MRP) – यामध्ये आंब्याच्या फोडींचा खरा आस्वाद घेता येईल.
  3. Raw Mango Drink (पन्हे): ५० रुपये (MRP)
  4. Amrut Kokam Drink: ५० रुपये (MRP)

नव्या पिढीची जिद्द आणि ‘ग्लोबल’ भरारी

या संपूर्ण प्रकल्पामागे ज्येष्ठ मार्गदर्शक जयंत देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. विशेष म्हणजे, देसाई कुटुंबातील तरुण पिढी म्हणजेच तनया देसाई, आकाश देसाई, आर्य देसाई आणि रोहन देसाई यांनी या उत्पादनांच्या निर्मितीसाठी आणि संशोधनासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या या मेहनतीमुळेच कोकणातील अस्सल चव आता जागतिक स्तरावर पोहोचणार आहे.

१ एप्रिलपासून सर्वत्र उपलब्ध

ही सर्व उत्पादने आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्यात आली असून ती अमेरिकेला निर्यात केली जाणार आहेत. भारतीय ग्राहकांसाठी ही उत्पादने १ एप्रिल पासून जवळच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला कोकणच्या अस्सल हापूस आणि कोकमाचा नैसर्गिक आस्वाद घेण्याची संधी आता सर्वांना मिळणार आहे.