Maharashtra Kesari 2026 पुणे : पुण्यातील वाघोली, तालुका हवेली इथं सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे. महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) आणि हर्षवर्धन सदगीर (Harshwardhan Sadgir) यांच्यात झाला.
हर्षवर्धन सदगीर यानं महेंद्र गायकवाड याला 4-3 असं पराभूत केलं. या विजयासह हर्षवर्धन सदगीर सातवा डबल महाराष्ट्र केसरी झाला.
हर्षवर्धन सदगीर सातवा डबल महाराष्ट्र केसरी
महेंद्र गायकवाड यानं पहिल्या हाफमध्ये 1 गुण मिळवत आघाडी घेतली. यानंतर हर्षवर्धन सदगीर यानं एक गुण मिळवत बरोबरी केली. पहिला हाफ संपेपर्यंत 1-1 असा सामना बरोबरीत होता. दुसऱ्या हाफमध्ये महेंद्र गायकवाड याला एक्टिव्हिटी टास्क देण्यात आला, यात त्याला गुण मिळवता आला नाही. यामुळं हर्षवर्धन सदगीरला एक गुण मिळाला. यानंतर हर्षवर्धन सदगीर यानं दोन गुण मिळवले. अशा प्रकारे हर्षवर्धन सदगीर यानं 4-1 अशी आघाडी मिळवली.यानंतर हर्षवर्धन सदगीर बाहेर गेल्यानं एक गुण महेंद्र गायकवाडला मिळाला. कुस्तीचा वेळ संपला तेव्हा हर्षवर्धन सदगीर यानं 4-3 असा विजय मिळवला.
महेंद्र गायकवाड यानं माती विभागातील अंतिम फेरीत सिकंदर शेखचा पराभव केला. तर हर्षवर्धन सदगीर यानं जय पाटील याचा गादी विभागातील अंतिम फेरीत केला. यामुळं महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड आमने सामने आले.
माती विभागात महेंद्र गायकवाड विजयी
माती विभागाच्या अंतिम फेरीत सोलापूर जिल्ह्यातून महेंद्र गायकवाड आणि हिंगोली जिल्ह्यातून सिकंदर शेख आमने सामने आले होते. या कुस्तीत महेंद्र गायकवाड यानं 3-0 असा विजय मिळवला. पहिल्या हाफमधील पहिल्या मिनिटातच महेंद्र गायकवाड यानं 2 गुण मिळवले. यानंतर पुन्हा एकदा महेंद्र गायकवाड यानं 1 गुण मिळवला. पहिल्या हाफमध्ये महेंद्र गायकवाड 3-0 अशा आघाडीवर होता. दुसऱ्या हाफमध्ये महेंद्र गायकवाड याच्या विरोधात सिकंदर शेख यानं गुण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, सिकंदर शेख याला गुण मिळवण्यात अपयश आलं. यामुळं महेंद्र गायकवाड यानं मॅटवर होणाऱ्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
मॅट विभागातील अंतिम फेरीत हर्षवर्धन सदगीर विजयी
मॅट विभागातील अंतिम फेरीची लढत सोलापूर शहरकडून खेळणाऱ्या जय पाटील आणि नाशिककडून खेळणाऱ्या हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली. हर्षवर्धन सदगीर यानं जय पाटील याचा 10-0 असा पराभव केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 23-03-2026














