मेष: आज कुटुंबात व कामाच्या ठिकाणी समजूतदारपणाने व्यवहार केल्याने संघर्ष टळतील. वाणीवर नियंत्रण न राहिल्याने कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे.
वृषभ: आज खंबीर विचारांमुळे आपण सावधपणे काम कराल.
आर्थिक विषयांचे योग्य नियोजन कराल. आपली कलात्मक जाण वाढीस लागेल.
मिथुन: आज आपली वाणी किंवा व्यवहार इतरांशी गैरसमज निर्माण करू शकतात. कुटुंबीय व सगे – सोयरे यांच्याशी वागताना खूप सांभाळून राहावे लागेल. आजार किंवा दुर्घटना होण्यामुळे ते संबंध सांभाळा.
कर्क: आज अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापार्यांशी फायद्याचे सौदे होतील. संतती व पत्नी ह्यांच्याकडून लाभ होईल.
सिंह: आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टिने उत्तम आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल.
कन्या: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव जाणवेल. थकवा व अशक्तपणामुळे कामे धीम्या गतीने होतील.
तूळ: आजचा दिवस अचानक धनलाभाचा आहे. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरीही नवे कार्य हाती घेऊ नका. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल.
वृश्चिक: आज दैनंदिन घटनाक्रमात बदल होईल. आज आपण मौज- मजा व मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. मित्र व कुटुंबीयांची त्यात साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात मान – प्रतिष्ठा वाढेल.
धनु: आजचा दिवस हर्षोल्हासात जाईल. परिवारात आनंदी वातावरण पसरेल. त्यामुळे मन आनंदी राहील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील.
मकर: आज आपण मनाने खूप अशांत राहाल. आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही व त्यामुळे तणावात राहाल. शक्यतो आज कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका.
कुंभ: आज आपण अती संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन व अस्वस्थ होईल. जीद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे.
मीन: आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्यांना भागीदारीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पति – पत्नी वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 24-03-2026














