चिपळूण: दळवटणे येथे श्री कान्होबा काळीश्री झोलाई देवीची त्रैवार्षिक यात्रा उद्यापासून; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

चिपळूण: दळवटणे (बागवाडी) येथील ग्रामदैवत श्री कान्होबा काळीश्री झोलाई देवीची बहुप्रतीक्षित त्रैवार्षिक यात्रा (समा) उद्यापासून म्हणजेच २५ आणि २६ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या यात्रेनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे जय्यत नियोजन करण्यात आले आहे.

यात्रेचे सविस्तर वेळापत्रक:

२५ मार्च रोजी:

  • सकाळी ८ वाजता: पारंपरिक पूजा आणि लाट तोडण्याचा कार्यक्रम.
  • दुपारी १२ वाजता: अभ्यागतांचे स्वागत व महाप्रसाद.
  • दुपारी ३ वाजता: वालोटी मारुती मंदिर ते दळवटणे-बागवाडी मंदिर अशी पारंपरिक वाद्यांच्या गजरात ‘लाटेची मिरवणूक’.
  • सायंकाळी ६:३० वाजता: मंदिर परिसरात पालख्यांचे आगमन.
  • रात्री ९ वाजता: धार्मिक कार्यक्रम.
  • रात्री ११ वाजता: लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील यांचा ‘हिन्याची हिरकणी’ हा विशेष लावणी कार्यक्रम.

२६ मार्च रोजी:

  • सकाळी ९:३० वाजता: स्तंभावर लाट चढविणे.
  • दुपारी १२ ते १: कै. कृष्णा राजाराम इंगवले यांच्या स्मरणार्थ ‘अक्षप्रसाद’.
  • दुपारी २ ते ४: पंचक्रोशीतील ग्रामदेवतांच्या पालख्यांची भेट.
  • सायंकाळी ४ ते ५: लाटेची प्रदक्षिणा व लाट फिरवणे.
  • सायंकाळी ६ वाजता: यात्रेची सांगता.

याशिवाय, यात्रेनिमित्त खुल्या गटातील कबड्डी स्पर्धा आणि २४ मार्च रोजी महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ (प्रमुख उपस्थिती: अभिनेता सिद्धेश उटकर) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या चैत्रोत्सवी यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष रुपेश इंगवले यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:20 24-03-2026