दापोली : दापोली विधानसभा मतदारसंघातील दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची काल छाननी करण्यात आली. त्यामध्ये एक अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली.
दापोली मतदारसंघासाठी ११ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले होते. त्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अनंत पांडुरंग जाधव यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात १० सूचक मतदार नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. आता निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष अबगुल, शिवसेनेचे योगेश कदम. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय कदम, बहुजन समाज पार्टीचे प्रवीण मर्चडे, तसेच योगेश रामदास कदम (अपक्ष), योगेश विठ्ठल कदम (अपक्ष), संजय सीताराम कदम (अपक्ष), संजय संभाजी कदम (अपक्ष), सुनील पांडुरंग खाडे (अपक्ष), ज्ञानदेव रामचंद्र खांबे (अपक्ष) हे १० उमेदवार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 31/Oct/2024














