खेड : मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसण्यासाठी पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधून शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली देत भगव्या झेंड्याला डाग लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत चुकीचे प्रायश्चित्त भोगावेच लागेल, असा हल्ला शिवसेना नेते व माजी पर्यावरणमंत्री रामदास ने कदम यांनी उद्धव ठाकरेंवर पत्रकार परिषदेत चढवला.
कदम म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर पखांद्याला खांदा लावून शिवसेना बळकटीसाठी झोकून काम करणाऱ्या नेत्यांना केवळ मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसण्यासाठीच संपवण्याचे पापदेखील उद्धव ठाकरे यांनीच केला. काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली, तर माझे शिवसेना नावाचे दुकान बंद करून टाकीन, अशी शपथ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. ही शपथ उद्धव ठाकरे यांनीच पायदळी तुडवत गद्दारी यांनीच केली. विधानसभा निवडणुकीकरिता महायुतीसाठी अनुकूल वातावरण आहे. विकासकामांची पोचपावती जनता निवडणुकीत महायुतीला नक्कीच देईल. शिवसेनेचे ७० आमदार हमखास निवडून येतील, असा विश्वासही व्यक्त केला. या प्रसंगी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, सचिन धाडवे, अरुण कदम, शहरप्रमुख कुंदन सातपुते, संजय मोदी, मिनार चिखले, सतीश चिकणे, राजेश बुटाला, कौशल चिखले आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 31/Oct/2024














