कोल्हापूर : भारतातील पाचव्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी एसएस मोबाईलच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने १ पे ४ ऑफर जाहीर करण्यात आली असून, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या ऑफरमध्ये एकाच स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना चार आकर्षक लाभ मिळणार आहेत. त्यामध्ये रु. ६,००० चे स्मार्ट गिफ्ट, २ वर्षांची वॉरंटी, ३० टक्क्यांपर्यंतचा डिस्काऊंट आणि अविश्वसनीय असा कॅशबॅक अशा सवलतींचा समावेश आहे.
विशेषतः, आयफोन १३ चक्क ३९ हजार ९९९ मध्ये उपलब्ध असून, आयफोन १६ वर १५ हजारांपर्यंतचा लाभ मिळत असल्याने ग्राहकांची झुंबड उडाली आहे. याव्यतिरिक्त, एआय फोनच्या मागणीमध्ये वाढ झाली असून, सॅमसंग प्रीमियम एस ५३, एस २३ एफई एआय फोनवर ४६ हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे.
दिवाळीच्या खास ऑफरमध्ये ५-जी फोन अविश्वसनीय अशा ऑफर किमतीत उपलब्ध आहे. स्मार्ट एसएस गिफ्टची किंमत मिठाईपेक्षा स्वस्त असल्याने जवळच्या मित्र, नातेवाईक, सहकारी यांना दिवाळी भेट म्हणून स्मार्ट गिफ्टला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या ऑफरमध्ये बोट, फायर ASS, वन प्लस या नामांकित ब्रँडच्या अॅसेसरीज उपलब्ध असून, नेक बँड, एअरबडस्, ब्लूटूथ स्पीकर, पॉवर बँक, कॉलिंगचे स्मार्ट वॉच आकर्षक सवलत किमतीत उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमध्ये ३०० शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या या ऑफर्सचा लाभ घेण्याचे आवाहन एसएस मोबाईलच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 31/Oct/2024














