IPL 2026 Schedule: IPL 2026 चं दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर; पाहा तुमच्या आवडत्या संघाचा सामना कधी?

मुंबई: क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे! भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. येत्या २८ मार्चपासून क्रिकेटच्या या महाकुंभाला सुरुवात होत असून, पुढील दोन महिने चाहत्यांना ‘फुल टू एंटरटेनमेंट’ मिळणार आहे.

२८ मार्चला सलामीची लढत; बंगळुरूत रंगणार सामना

यंदाच्या हंगामाचा पहिला सामना २८ मार्च रोजी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येतील. पहिल्या टप्प्यात १२ एप्रिलपर्यंत एकूण २० सामने होणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात ५० सामन्यांचा थरार

बीसीसीआयने जाहीर केलेल्या दुसऱ्या सत्राच्या वेळापत्रकानुसार:

  • कालावधी: १३ एप्रिल ते २४ मे २०२६.
  • एकूण सामने: दुसऱ्या टप्प्यात ५० सामने खेळवले जातील (लीग स्टेजमध्ये एकूण ७० सामने होतील).
  • ठिकाणे: हे सामने देशातील १२ प्रमुख शहरांमध्ये आयोजित केले आहेत. यामध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद, लखनौ, जयपूर, धरमशाला, रायपूर, बंगळुरू आणि न्यू चंदीगडचा समावेश आहे.
  • दुसऱ्या सत्राची सुरुवात: १३ एप्रिलला हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या हायव्होल्टेज सामन्याने होईल.

पहिल्या २० सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक (२८ मार्च – १२ एप्रिल)

क्र.तारीखसामनाठिकाणवेळ
२८ मार्चRCB vs SRHबंगळुरूसायं. ७.३०
२९ मार्चMI vs KKRमुंबईसायं. ७.३०
३० मार्चRR vs CSKगुवाहाटीसायं. ७.३०
३१ मार्चPBKS vs GTन्यू चंदीगडसायं. ७.३०
१ एप्रिलLSG vs DCलखनौसायं. ७.३०
२ एप्रिलKKR vs SRHकोलकातासायं. ७.३०
३ एप्रिलCSK vs PBKSचेन्नईसायं. ७.३०
४ एप्रिलDC vs MIदिल्लीदु. ३.३०
४ एप्रिलGT vs RRअहमदाबादसायं. ७.३०
१०५ एप्रिलSRH vs LSGहैदराबाददु. ३.३०
११५ एप्रिलRCB vs CSKबंगळुरूसायं. ७.३०
१२६ एप्रिलKKR vs PBKSकोलकातासायं. ७.३०
१३७ एप्रिलRR vs MIगुवाहाटीसायं. ७.३०
१४८ एप्रिलDC vs GTदिल्लीसायं. ७.३०
१५९ एप्रिलKKR vs LSGकोलकातासायं. ७.३०
१६१० एप्रिलRR vs RCBगुवाहाटीसायं. ७.३०
१७११ एप्रिलPBKS vs SRHन्यू चंदीगडदु. ३.३०
१८११ एप्रिलCSK vs DCचेन्नईसायं. ७.३०
१९१२ एप्रिलLSG vs GTलखनौदु. ३.३०
२०१२ एप्रिलMI vs RCBमुंबईसायं. ७.३०

प्ले-ऑफ आणि फायनलबाबत उत्सुकता कायम

लीग स्टेजचे सामने २४ मे पर्यंत चालणार असले तरी, बीसीसीआयने अद्याप सेमीफायनल आणि फायनल सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणांची घोषणा केलेली नाही. लीग स्टेज संपल्यानंतर या बाद फेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 27-03-2026