Today Daily Horoscope
मेष: आज आपण अधिक हळवे व भावनाशील होण्याची शक्यता असल्याने आपणास सावध राहावे लागेल. आज लहान -सहान गोष्टींनी आपल्या मनास ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.
वृषभ: आज आपल्या चिंता दूर होऊन आपल्या उत्साहात वाढ होईल. मन आनंदी राहील. जास्त भावूक व हळवे व्हाल. आपली कल्पनाशक्ती विकसित होईल. त्यामुळे सृजनशील साहित्य रचना करू शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.
मिथुन: आज थोडा विलंब किंवा अडचणींनंतर निर्धाराने काम पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन यशस्वी कराल. मिष्टान्नाची प्राप्ती होईल. विद्यार्जनाच्या दृष्टीने विद्यार्थांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्नेही व मित्र परिवाराच्या भेटीने आनंद होईल.
कर्क: आज भावनांच्या प्रवाहात आपण मश्गुल व्हाल ज्यात कुटुंबीय व स्नेही, नातलग सहभागी होतील. भेट वस्तू मिळतील. स्वादिष्ट भोजन व बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. मंगल प्रसंगांना हजेरी लावाल. आनंददायक प्रवास होतील.
सिंह: आज जास्त चिंतातुर व भावनाशील राहिल्याने आपणास शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. चुकीच्या वाद – विवादामुळे भांडण निर्माण होईल. कोर्ट – कचेरी प्रकरणात सावध राहावे. उक्ती व कृती यात संयम राखणे आवश्यक आहे.
कन्या: आज नाना प्रकारचे लाभ हेणारा दिवस आहे. व्यापार – व्यवसायाच्या विकासा बरोबरच उत्पन्न वाढेल. नोकरी करणार्यांना लाभाच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात सुख – शांती लाभेल. पत्नी, संतती, वडीलधारी यांचेकडून लाभ होईल.
तूळ: आज घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत पगार वाढ व पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आईकडून लाभ होईल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. कार्यालयात वरिष्ठ अधिकार्यांकडून कामाची स्तुती होऊन प्रेरणा सुद्धा मिळेल.
वृश्चिक: आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. थकवा व आळस यांमुळे स्फूर्तीची उणीव राहील. मनात गाढ चिंता सतत येत राहतील. नोकरी – व्यवसायात अडचणी येतील. वरिष्ठ अधिकार्यांशी वादविवाद टाळा. परदेश गमनाच्या संधी येतील.
धनु: अनपेक्षित घटना, आजारपण, राग यामुळे आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवावे. सरकार विरोधी प्रवृत्ती घातक ठरेल. काही कारणाने वेळेवर भोजन मिळणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवा. भांडण – तंट्या पासून दूर राहा.
मकर: आज आपल्या विचारात व व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपले कुटुंबीय व मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. शरीर व मन, स्फूर्ती व प्रसन्नतेने भरेल. व्यवसाय वाढ होईल. दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल.
कुंभ: आज केलेल्या कामात आपणाला यश, कीर्ती व सफलता मिळेल. कुटुंबात एकोपा राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.आपले विचार व व्यवहार यांत हळवेपणा राहील. नोकरीत सहकारी सहकार्य करतील.
मीन: आज आपल्या अंगी असलेली सृजनात्मकता बाहेर पडून आपण साहित्य क्षेत्रात लेखन किंवा पठण कार्यात रूची घ्याल. हृदयाची कोमलता प्रियजनांस जवळ आणेल. स्वभावात हळवेपणा व रसिकता राहील. स्वास्थ्याच्या दृष्टीने दिवस मध्यम आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही.}
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 28-03-2026














