खेड : राज्यात शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत राज्यभरात उद्धव ठाकरेंना उमेदवार आयात करावे लागत असल्याची टीका शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मंगळवारी दि. २९ रोजी खेड येथे पत्रकार परिषद घेऊन केली.
यावेळी रामदास कदम म्हणाले की, शिवसेनेने राज्यात उभे केलेले सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. उद्धव ठाकरे यांनी कॉग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेऊन शिवसेना प्रमुखांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यामुळे आज त्यांच्यावर राज्यभर उमेदवार आयात करण्याची वेळ आली आहे. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यासमोर ज्या महिला उमेदवार त्यांनी दिल्या आहेत, त्यांनी यापूर्वी वंचित व अन्य काही पक्षांकडे उमेदवारी मागितली होती. शेवटी उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. त्यामुळे राज्यभर शिवसेनेच्या उमेदवारांना यश मिळेल.
मात्र, उद्धव ठाकरे यांना पश्चाताप करण्याची वेळ येईल. ज्या शिवसेना प्रमुखांनी काँग्रेससोबत संघर्ष करत पक्ष ज्या शिवसेना प्रमुखांनी काँग्रेससोबत संघर्ष करत पक्ष मोठा केला, त्याच काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंनी जाऊन केलेली चूक त्यांना महागात पडेल. शिवसेना प्रमुखांच्या विचारांच्या विरोधात गेल्यावर काय होत, हे उद्धव ठाकरेंना या निवडणुकीच्या निकालानंतर अनुभवायला मिळेल तर एकनाथ शिंदे यांनी घेतलेले लोकोयोगी निर्णय यांच्या बळावर त्यांना नक्की जनता स्वीकारेल, राज्यात माझी संघटनेने स्टार प्रचारक म्हणून निवड केली असल्याने मी पन्नास सभा राज्यभर घेणार असून असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 31/Oct/2024














