गुहागर : गुहागर तालुक्यातील नरवण येथील श्रीराम मंदिरात सलग १७ व्या वर्षी श्रीराम दीपोत्सव मंडळाच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सन २००८ साली श्रीराम दीपोत्सव मंडळाच्यावतीने या दीपोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. सलगच्या १७ व्या वर्षी ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दीपोत्सव होणार आहे. दि. ३१ रोजी सायंकाळी ७.३० वा. डॉ. कैलास वैद्य यांच्या हस्ते दीपोत्सवाचा शुभारंभ उत्साहात होणार आहे. दि. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वा. महाआरती, रात्री १० वा. स्वरसंध्या तसेच दि. २ रोजी रात्री १० वा. श्रीराम नमन-नाट्य मंडळ कामथे हुमणेवाडी (ता. चिपळूण) यांचे नमन होईल. याचबरोबर दि. ३ रोजी सायंकाळी सर्व स्थानिक भजने होतील. यानंतर दीपोत्सवाची सांगता होणार असल्याचे कळवण्यात आले आहे. सलग ४ दिवस १ हजार १११ दिवे उजळून साजरा होणारा दीपोत्सव हा एकमेव असून या दीपोत्सवाला यांसह आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमाला तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम दीपोत्सव मंडळ नरवण यांजकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 31/Oct/2024














