रत्नागिरी : मिरजोळे एमआयडीसी येथील कंपनीच्या छतावरून कोसळून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७. ३० वाजण्याच्या सुमारास घडली. अभिजित आत्माराम शेलार (३५, रा. कसोप, तेलीवाडी रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. अभिजित हा २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी मिरजोळे एमआयडीसी येथील कंपनीत कामाला आला होता. कंपनीच्या छतावर काम करत असताना अचानक पत्रा तुटल्याने अभिजीत हा खाली कोसळला. या घटनेत त्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याने उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. त्याच्या मागे वडील, पत्नी, मुलगी, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 31/Oct/2024














