चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फ विद्यार्थांच्या सुप्त कलागुणांना वाव देवून त्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने महाविद्यालयात विविध कार्यक्रम, स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून नुकताच महाविद्यालय कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये भावगीत, भक्तिगीत, लोकगीते, गायन, एकपात्री अभिनय, नकला, नृत्य, समूहगीत लोकगीते यांचे सादरीकरण करण्यात आले. कला उत्सवाचे उद्घाटन नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. माधव बापट कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. नामदेव तळप यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वरिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य डॉ. आर. एम. मोरे, पर्यवेक्षिका प्रा. स्नेहल कुलकर्णी, रजिस्ट्रर अनिल कलकुटकी, वरिष्ठ महाविद्यालय सांस्कृतिक प्रमुख. डॉ. राहुल पवार उपस्थित होते. कला उत्सवात एकूण पंधरा कलाप्रकार सादर करण्यात आले तर ६५ विद्यार्थिनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागातील प्रा. मृण्मयी सोहनी, प्रा. दिशा दाभोळकर, प्रा. मिता तांबे, प्रा. सिद्धी साडविलकर, प्रा. उज्ज्वला कुलकर्णी, प्रा. विठ्ठल कोकणी, प्रा. परेश कदम यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन साईदास राजेशिर्के, श्रावणी सकपाळ, मुस्कान बेबल यांनी केले तर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सावरे यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 31/Oct/2024














