रत्नागिरी : डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात निःशुल्क योग शिकण्याची संधी

रत्नागिरी : शहरातील कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात निःशुल्क योगाचे आयोजन केले आहे.

हा योग अभ्यासक्रम ११ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२४ या १५ दिवसांच्या कालावधीत सायंकाळी ५ ते ५.३० या वेळेत घेतला जाणार आहे. या अभ्यासक्रमात आसने, प्राणायाम घेण्यात येणार असून योग प्रात्यक्षिकांचे पद्धतशीर ज्ञान रत्नागिरीकरांना मिळणार आहे. हा अभ्यासक्रम मोफत असल्याने केवळ आपल्याला वेळेची गुंतवणूक करावी लागणार आहे. कामाच्या व्यस्ततेतून आपल्या आरोग्यासाठी वेळ देण्याची ही सुवर्ण संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे.

हा अभ्यासक्रम अरिहंत मॉल येथील रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात होणार आहे.

इच्छुकांनी (७७९८४९०६१५) या क्रमांकावर संपर्क त्वरित साधावा. तसेच इच्छुकांनी येथे क्लिक करून नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 31/Oct/2024