रत्नागिरी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ८ ते १४ एप्रिल दरम्यान राज्यभर ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा केला जात आहे. रत्नागिरीतील कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे बुधवारी या सप्ताहाचा शानदार शुभारंभ करण्यात आला.
योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणार
समाज कल्याण सभापती ॲड. कांबळे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि वंचित घटकांसाठी शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि समाजात जनजागृती करणे, हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.
विविध उपक्रमांचे आयोजन
समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी प्रास्ताविकात सप्ताहाच्या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची रूपरेषा मांडली. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचनही करण्यात आले. या प्रसंगी अपूर्वा कारंडे (प्र. सहाय्यक संचालक), ओरेनवरु (महात्मा फुले विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक), प्रीती पटेल (शामराव पेजे महामंडळ जिल्हा व्यवस्थापक) आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 09-04-2026














