कोकण विभागीय पेन्शन अदालत 15 एप्रिल रोजी

नवी मुंबई : कोंकण विभागातील पेन्शन अदालत दरमहा दुसऱ्या मंगळवारी आयोजित करण्यात येते. तथापि एप्रिल 2026 महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने एप्रिल, 2026 या महिन्यात विभागीय पेन्शन अदालत बुधवार दि.15 एप्रिल, 2026 रोजी दुपारी 12.00 वा. कोकण भवनातील कक्ष क्र. 106 सामान्य प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय कोंकण भवन येथे आयोजित केली आहे.

या पेन्शन अदालतीमध्ये महसूल विभागातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पेन्शन प्रकरणांच्या अडचणींचे निवारण करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रकरणांबाबतच्या तक्रारी असल्यास सदर दिवशी त्याबाबतचे अर्ज स्वीकारले जातील. कोकण विभागातील पेन्शन धारकांनी या पेन्शन अदालतीला उपस्थित राहून पेन्शन विषयी आपले प्रश्न उपस्थित करावे, असे कोकण विभाग तहसिलदार (सामान्य प्रशासन) गजानन धुमाळ यांनी कळविले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:52 09-04-2026