महायुतीतून उभा राहिलेला प्रत्येक उमेदवार आपलाच समजून कामाला लागा : भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत

संगमेश्वर : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे सरकार आणायचे असेल तर महायुतीतून उभा राहिलेला प्रत्येक उमेदवार आपलाच समजून कामाला लागा, असे आवाहन देवरुख येथील माटे-भोजने सभागृहात महायुतीच्या संगमेश्वर तालुक्यातील प्रमुख प्राधिकारी व कार्यकर्ता समन्वयक बैठकीत करण्यात आले.

बैठकीला प्रमोद अधटराव, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष प्रमोद पवार, भाज्या दक्षिण मंडळ अध्यक्ष रुपेश कदम, देवरुख माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, माजी उपनगराध्यक्ष सुशांत मुळये, बापू शेट्ये, विवेक शेरे, राजेंद्र सुर्वे, सदानंद भागवत, आरपीआपने अध्यक्ष राजेंद्र मोहिते, कृष्णा हरेकर, पंकज पुसाळकर आदी उपस्थित होते. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले, या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला उमेदवारी मिळालेली नाही. मात्र भाजप हा पक्ष पहिले राष्ट्र.. नंतर पक्ष आणि मग स्वतः या पद्धतीने काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जिंकायचे असेल तर महायुतीतील प्रत्येक उमेदवार हा आपलाच मानून काम करावे लागेल.

शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांनी महायुतीतील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेखर निकम यांना निवडून आणण्यासाठी काम करू या, असे मत व्यक्त करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बैठकीला कार्यकत्यांची उपस्थिती पाहून महायुतीतील सर्वच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दाखवलेला विश्वास आणि मनाचा मोठेपणा माझ्यासाठी या निवडणुकीसाठी मोलाचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने काम करून राज्यात महायुतीचे सरकार आणू या, असे आवाहन आमदार निकम यांनी व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:26 PM 31/Oct/2024