रत्नागिरी : सध्या उदय सामंत यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र आहे. उदय सामंत यांची काम करण्याची पद्धत आणि रत्नागिरीत केलेली प्रचंड विकासकामे डोळ्यासमोर ठेऊन पुढील काळात देखील हाच लोकप्रतिनिधी हवा अशी मागणी आता विविध स्तरातून मोठ्या प्रमाणावर होत आहे.
रत्नागिरी येथील एक प्रख्यात कुटुंब म्हणून ओळख असणाऱ्या पटवर्धन कुटुंबीयांची बैठक झाडगाव येथील अभय पटवर्धन यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांना पटवर्धन कुटुंबीयांकडून आमंत्रित करण्यात आले होते. रत्नागिरीतील सर्व पटवर्धन कुटुंबीय आणि त्यांचे मित्र आप्तेष्ट मोठ्या संखेने यावेळी उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय यावेळी पटवर्धन कुटुंबीयांकडून घेण्यात आला. याच ठिकाणी पटवर्धन कुटुंबीयांचे १४५ वर्षाचे गोपाळ कृष्णाचे मंदिर आहे. या मंदिरात उदय सामंत यांना या निवडणुकीत प्रचंड यश मिळावे म्हणून गाऱ्हाणे देखील घालण्यात आले. या बैठकीला रत्नागिरीतील सर्व पटवर्धन कुटुंबीय मोठ्या संखेने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:53 PM 31/Oct/2024














