पावस : श्री स्वामी स्वरूपानंद यांचा १२२ वा जन्मोत्सव सोहळा २२ ते २७ डिसेंबर या कालावधीत साजरा होणार आहे.
मार्गशीर्ष वद्य द्वादशीला स्वामीजींचा १२२ वा जन्मोत्सवाचा मुख्य दिवस आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
जन्मोत्सवानिमित्त ७ डिसेंबरला सकाळी १० ते दुपारी २.३० स्वामी स्वरूपानंद आंतरराज्यस्तरीय उच्च व कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा गोगटे-जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे होतील. तिथेच पारितोषिक वितरण होईल. त्याचे उद्घाटन स्वामी अद्वयानंद यांच्या हस्ते होईल.
सात रोजी सकाळी ८.३० वा. बालगट पठण स्पर्धा रत्नागिरी येथील-बियाणी बालकमंदिर, १५ ला स्वामीजींचा तारखेप्रमाणे जन्मोत्सव आहे. यानिमित्त लक्ष्मीचौक ते आध्यात्म मंदिर बालदिंडी, सायंकाळी श्री क्षेत्र पावस षण्मासिकाचे प्रकाशन व प्रणव गोखले यांचे प्रवचन होणार आहे. २२ ला सकाळी पावस पायी दिंडी तर २६ पर्यंत दररोज सकाळी ७ ते १२ स्वामी स्वरूपानंद यांच्या ग्रंथांचे पठण होईल.
२२ ला धनश्री कुलकर्णींचे अभंग गायन, २३ ला राज्यस्तरीय श्रीमत् संजीवनी गाया अभंग गायन अंतिम स्पर्धा, २४ ला (कै.) र. वा. तथा भाऊराव देसाई स्मृतीप्रित्यर्थ जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व व पाठांतर स्पर्धा आणि अभंग गायन, २५ ला विशाखाताई भिडेंचे कीर्तन, २६ ला गिरिजा करंबेळकरांचे कीर्तन आणि रोहित फाटक यांचे अभंग गायन होईल.
स्वामींचा १२२वा तिथीप्रमाणे जन्मदिन मार्गशीर्ष वद्य द्वादशी, २७ ला पहाटे ३ वा. काकड आरती, ४ वा. समृद्ध पूजा, ६ वा. आरती गावातील प्रमुख देवस्थानी पूजा व मंत्राभिषेक करण्यात येईल. सकाळी ९ वा. मुख्य दिंडी, आरतीनंतर महाप्रसाद, हार्दिका फडके यांचे भरतनाट्यम्, संजीवनी गाथेवरील कार्यक्रम, भजन, भाऊराव देसाई वक्तृत्व स्पर्धा सादरीकरण व पारितोषिक वितरण, सायंकाळी अवधूतबुवा टाकळीकर जन्माचे कीर्तन आणि रात्री ९ वा. प्रथमेश लघाटे यांच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:51 31-10-2024














