देवरुख : कौशल भारत-कुशल भारत अंतर्गत ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत लाईफगार्ड सर्टिफिकेट कोर्स मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील नक्षत्र सभागृहात दिवाळीच्या सुट्टीत या वर्गाचे आयोजन केले आहे. अडचणीच्या वेळी दुसऱ्याला मदत करणाऱ्यांना प्रशिक्षण असणे आवश्यक आहे, याच उद्देशाने हे प्रशिक्षण होत आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना १५ हजार रुपयांचे लाईफगार्ड कीट देण्यात येणार आहे. यासाठी कमीत कमी दहावी पास उमेदवार असावा. वयोमर्यादा १८ ते ४५ ठेवण्यात आली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रशिक्षण होणार असून, जास्तीत जास्त तरुणांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:09 31-10-2024














