रत्नागिरी : दीपावलीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून रत्नागिरी जिल्ह्यात धुमधडाक्यात सण साजरा केला जात आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अमावस्येला लक्ष्मीपूजनाने लक्ष्मी-कुबेराची आराधना करण्यात आली. व्यापारी वर्गाने मोठ्या उत्साहात चोपड्यांचे पूजन केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
जिल्ह्यात सायंकाळी पडलेल्या पावसाने मात्र व्यापारी वर्गाचा हिरमोड केला आहे. पुढील तीन ते चार नोव्हेंबरपर्यंत हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सायंकाळी खरेदीला होणारी गर्दी कमी झाली असली तरी दिवसभर खरेदीसाठी गर्दी होत असल्याने व्यापारी वर्ग सुखावला आहे. दीपावलीच्या पहिल्या दिवशी मोठा उत्साह दिसून आला. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची दिवाळी शेतातच होताना दिसत आहे.
दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीकुबेराचे पूजन उत्साहात पार पडले. व्यापारी वर्गाने नवीन चोपड्यांची पूजा केली. व्यापाऱ्यांसह घरोघरी लक्ष्मीचे पूजन करून प्रार्थना करण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गानही शेतातील कामे सायंकाळी लवकर आटपून पूजन करीत शेतीसह वर्षभर सुखसमृध्दी नांदू दे, अशी प्रार्थना केली. दीपावलीच्या पहिल्या दिवसाप्रमाणेच लक्ष्मीपुजनाचा मुहुर्त साधून अनेकांनी दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची खरेदीही केली. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्रीही मोठ्या प्रमाणात होताना दिसत होती. शनिवारी पाडवा असल्याने, महिला वर्ग व नवदांपत्याकडून सोन्याची खरेदी करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 02/Nov/2024
