चिपळूण : ‘डीबीजे’ महाविद्यालयात रंगली दिवाळी पहाट संगीत मैफल

चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात दिवाळी पहाट संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीचे आठवे पुष्प विशारद गुरव, वरद केळकर, ऐश्वर्या भोळे, हर्षाली कालेकर यांच्या स्वरांनी गुंफले.

यावेळी संवादिनी साथ मानस साखरपेकर, कीबोर्ड अथर्व भेकरे, तबलासाथ अॅड. अमेय भिडे, पखवाजसाथ संकेत नवरत तर निवेदन प्रिया कानेटकर हिने केले. या मैफिलीत दिवे लागले रे, फुलले रे क्षण माझे, आम्हा न कळे नाम, मी राधिका, पद्मनाभा नारायणा, विशारदने सादर केलेले सुरतपिया या गाण्याला भरभरून दाद मिळाली. ऐरणीच्या देवा तुला, अबीर गुलाल उधळीत रंग, कानडा राजा पंढरीचा, अगा वैकुंठीच्या राया या विशारद आणि वरद यांनी गायलेल्या भैरवीने सर्वांची मने जिंकली.

महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे या दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. राहुल पवार, प्रा. के. एस. सावरे, प्रा. सोनाली खर्चे, प्रा. अस्मिता जोशी, प्रा. शिल्पा भिडे, प्रा. पिसे, प्रा. तेजल गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला चेअरमन मंगेश तांबे, व्हा. चेअरमन डॉ. दीपक विखारे, अविनाश जोशी, माधव टिकेकर, सावित्री होमकळस, माजी प्राचार्य डॉ. श्याम जोशी, प्रा. विनायक होमकळस, कांता कानिटकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 02/Nov/2024