गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गायवडी ते वरवडे तिवरी बंदर मार्गावर गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. तसेच अनेक ठिकाणी महावितरणचे विद्युत खांब कोसळून आणि विद्युत तारा तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता.
गुरुवारी दुपारपर्यंत वातावरण कोरडे होते. मात्र सायंकाळनंतर गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे झाडे आणि तारा कोसळल्याने वाहनांना रस्ता जाण्या येण्यासाठी योग्य नसल्याने अन्य पर्यायी मार्गाने वाहतूक करावी लागली. या मुख्य मार्गावर वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याने मोठी गैरसोय झाली होती.
या रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने शुक्रवारी झाडे बाजूला करून वाहतूक व विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्याचे काम सुरू होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 02/Nov/2024