रत्नागिरी : तालुक्यातील गोळप सडा येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची २५ लिटर दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.१५ वा. करण्यात आली. प्रणव शामराव पाटील (३४, रा. मिरजोळे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी तो गोळपसडा येथे आपल्या ताब्यात २ हजार ६५० रुपयांची २५ लिटर दारू विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून दुचाकीसह एकूण ५२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयिताविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 02/Nov/2024














