रत्नागिरीतील वैश्य समाज बांधव उदय सामंत यांच्या पाठीशी

रत्नागिरी : समाजासाठी नेहमीच मदतीला धावणारे आणि समाजाच्या प्रत्येक अडचणीत पाठीशी असणारे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार रत्नागिरीतील वैश्य समाज बांधवानी केला आहे.

रविवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीतील वैश्य समाजाने आमदार उदय सामंत यांना वैश्य समाजाच्या श्री राधाकृष्ण मंदिरात आमंत्रित केले होते. यावेळी समाज संस्थेचे पदाधिकारी, संस्थेचे विश्वस्थ आणि मोठ्या संखेने वैश्य बांधव उपस्थित होते.

समाजाच्या प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी उदय सामंत हे धाऊन आले आहेत. वैश्य समाज हा मोठ्या प्रमाणात व्यापारात आहे. कोरोनाच्या काळात देखील उदय सामंत हे व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उपस्थित राहिले होते. वैद्यकीय क्षेत्रात कोणतीही मदत असो अथवा इतर कोणतीही अडचण; शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यात उदय सामंत यांनी वैश्य समाजाला नेहमीच मदत केली आहे. या केलेल्या कामाची जाणीव ठेवून आपल्या हक्काचा माणूस आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेला पाहिजे असे मत येथे उपस्थित असणाऱ्या समाजबांधवांनी व्यक्त केले. अनेकांनी उदय सामंत यांच्या कामाबाबतचे आपले अनुभव देखील सांगितले. येत्या निवडणुकीत सर्व ज्ञाती बांधव उदय सामंत यांच्या पाठीशी राहतील असे आश्वासन देखील समाजबांधवांकडून यावेळी देण्यात आले.

कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मी आपल्या मदतीला येत नाही तर हे करणे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्यच आहे. आपली मदत करण्याचे भाग्य मला मिळते हे खूप मोठे आहे असे उद्गार उदय सामंत यांनी यावेळी काढले.

उदय सामंत यांना या निवडणुकीत प्रचंड यश मिळो, अशी प्रार्थना देखील श्री राधाकृष्णाच्या चरणी करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 02-11-2024