मंडणगड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेच्या अंमलबजावणीकरिता याचबरोबर दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनखाली मंडणगड पोलीस स्थानकाच्यावतीने १ नोव्हेंबर रोजी रूट मार्च घेण्यात आला. मंडणगड शहर, म्हाप्रळ, कुंबळे, पंदेरी याठिकाणी पोलिसांनी संचलन केले. या रूट मार्चमध्ये सीमा सुरक्षा दलाचे जवान व मंडणगड पोलीस स्थानकाचे सर्व कर्मचारी सहभागी होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 02/Nov/2024














