चिपळूण : चिपळूण-गुहागर मार्गावरील उमरोली येथील नातू हॉस्पिटलसमोर २२ ऑक्टोबरला ट्रकच्या मागील बाजूस दुचाकीची धडक बसून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता; मात्र घटनेनंतर दोन अज्ञात तरुणांनी ट्रक पेटविल्याने दोन लाखांचे नुकसान झाले.
याप्रकरणी दोन अज्ञात तरुणांवर बुधवारी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद ट्रकचालक रमाकांत धनेश्वर यादव (रा. कळंबस्ते फाटा, चिपळूण) यांनी दिली आहे. यादव हे ट्रकमधून शृंगारतळी येथील कल्लन भंगारवाले यांचा पुड्डा घेऊन खेर्डी एमआयडीसीत जात होते. याचवेळी ट्रक उमरोली येथे आला असता मागून दुचाकीने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकी ट्रकच्या मागील चाकाखाली जाऊन एक तरुण गंभीर जखमी झाला व तिथेच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तेथे मोठी गर्दी झाली. या गर्दीतील दोन तरुणांनी रागाच्या भरात ट्रकला आग लावली. त्यामध्ये ट्रकची केबीन व दर्शनी भाग जळून खाक झाला. यामध्ये ट्रकचे दोन लाखांहून अधिक नुकसान झाले. याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 02-11-2024














