चिपळूण : शिरगाव येथे आज दीपसंध्या कार्यक्रम

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे नोव्हेंबर रोजी श्री विश्वकर्मा कलामंच यांच्या वतीने दीपावलीनिमित्त दीपसंध्या कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता शिरगाव हायस्कूल मैदानात होणार आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शिरगाव येथे श्री विश्वकर्मा कलामंच यांच्या वतीने शिरगाव हायस्कूलच्या मैदानात भाव गीत, भक्ती गीत यांची सुरेल मैफल रंगणार आहे. यावेळी तालुक्यातील स्वप्नील चिले, अभिषेक सुतार, अनिकेत चव्हाण, स्वरा यादव, क्षितिज गांधी, रोहिणी माचकर, सिद्धेश इंदुलकर आपली कला सादर करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत.

यावेळी उद्योजक महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव, महायुतीचे उमेदवार आ. शेखर निकम, उबाठा गटाचे तालुकाप्रमुख विनोद झगडे, बाबू साळवी, चिपळूण नागरी पतसंस्थेच्या सीईओ स्वप्ना यादव, काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शाह, मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, सेनेचे माजी तालुकाप्रमुख सुधीर शिंदे, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, भाई शिंदे, शिरगाव सरपंच निता शिंदे, अनिल शिंदे, उपसरपंच नागेश सोलकर, ग्रामपंचायत सदस्य उमेश चिपळूणकर, उद्योजक तात्या अपिष्टे, शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाटील, शिरगाव व्यापारी मंडळ अध्यक्ष शिवराज उर्फ बाबू कापडी, लिबर्टी एकता युवा मंच अध्यक्ष नीलेश कोलगे, शिरगाव व्यापारी मंडळ अध्यक्ष प्रकाश लब्धे आदी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम मौजे शिरगाव शिक्षण प्रसारक संस्था व रोहन नलावडे यांच्या सहकायनि होत आहे. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन निसार शेख यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 02/Nov/2024