गुहागरमध्ये ‘एक दिवा शहिदांसाठी’ उपक्रम

गुहागर : दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना तसेच सीमेवर लढणाऱ्या आणि कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांप्रति कृतज्ञता आणि संवेदना व्यक्त करण्यासाठी शिवतेज फाऊंडेशन आणि समस्त गुहागरवासीयांतर्फे दिवाळीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ७ वा. गांधी चौक येथे ‘एक दिवा शहिदांसाठी’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

सलग अकरा वर्षे हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक प्रतापराव शिर्के आणि नीलेश पाटील यांची उपस्थिती होती. त्यांनी सीमेवरील काही किस्से सांगितले त्याने नागरिकांच्या अंगावर शहारे आले. संपूर्ण गांधी चौक दिव्यांनी प्रकाशमान झाले होते. उपक्रम यशस्वीतेसाठी अॅड. संकेत साळवी, राजेंद्र आरेकर, निलेश गोयथळे, संतोष वरंडे, गणेश धनावडे, विकास मालप, सुहास सातार्डेकर, अलंकार विखारे, मनोज बारटक्के, प्रभुनाथ देवळेकर, अंकुश विखारे, राहुल कनगुटकर, उमा बारटक्के, श्रद्धा घाडे, सारिका कनगुटकर, सुप्रिया वाघधरे यांनी मेहनत घेतली. पोलिस निरीक्षक सचिन सावंत, पोलिस कॉन्स्टेबल चौगुले, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, उद्योजक शैलेंद्र खातू, शामकांत खातू, माजी नगराध्यक्षा स्नेहा वरंडे, गुहागर तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष मनोज बावधनकर, सत्यवान घाडे आदींसह नागरिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 02/Nov/2024