गुहागर : तालुक्यातील गिमवी येथील आदिवासी कातकरीवाडीत कुटुंबांना दिवाळीनिमित्त ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) या संस्थेतर्फे फराळ वाटप करण्यात आले.
गिमवी येथे एकच आदिवासी कातकरीवाडी आहे. तेथे ठिकाणी जनमन योजनेची ५ घरकुले मंजूर आहेत. ही घरकुले पाहिल्यानंतर ‘ऑफ्रोह’चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी वाडीतील संतोष निकम यांना ऑफ्रोहचा छोटा उपक्रम सांगितला. या उपक्रमाला ऑफ्रोहच्या सर्वांनीच सहमती दिली. ऑफ्रोहचे सभासद आकाश दांडगे, स्मिता कुंभारे, गजेंद्र पौनीकर, पौनीकर यांची कन्या शिवाली यांनी या आदिवासी वाडीत फराळ वाटप केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 02-11-2024














