चिपळूण : शहर परिसरात मोकाट फिरणाऱ्या आठ गाढवांना पकडण्याची कारवाई पालिकेने केली आहे. या गाढवांना शहरातील (कै) अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल परिसरात बांधून ठेवण्यात झाले आहे मात्र दोन दिवस झाले तरी या यादवांना गाढवांना घेण्यासाठी मालक पुढे आलेले नाहीत. पाच हजार रूपयांचा दंड भरावा लागेल, या भीतीने मालकानी धसका घेतला असून पडद्यामागेच राहणे पसंद केल्याचे दिसून येत आहे.
चिपळूण शहरात तसेच बाजाराोठेत गुरे, मोकाट गाढवे आणि भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः नागरिक, व्यावसायिक व विद्यार्थी हैराण झाले आहेत. या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने होत आहे, काही पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पालिकेवर धडक देत या प्रश्नाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. अखेर पालिकेने या मागणीची गंभीरपणे दखल घेत शहरात फिरणाऱ्या गाढवांना ताब्यात घेण्याची मोहीम हाती घेतली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी आठ गाढवे पकडली आहेत.
या पकडलेल्या गाढवांना शहरातील (कै.) अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल परिसरात बांधून ठेवले आहे. वारंवार सूचना करून, नोटीस बवावूनही मोकाट गाढवांचा त्रास कमी न झाल्याने पालिकेने कारवाईचा निर्णय घेतला. या गाढवांच्या मालकांकडून दंड वसूल केला जाणार आहे. मात्र दोन दिवस ओलांडले तरीही गाढवे ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या मालकांनी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे केवळ ओझे वाहण्यासाठी आणि त्यातून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यासाठी गाढवांचा वापर करणाऱ्या मालकांविषयी संताप व्यक्त केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 02/Nov/2024









