देवरुख : दिवाळी सुट्टीतून काही गोष्टी व रूढी, परंपरा जतन करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे स्मरण बाल वयापासूनच व्हावे, यासाठी संगमेश्वर तालुक्यातील धामणी पाष्टेवाडी व काकडवाडी येथील बाल गोपाळानी सिंहगडाची प्रतिकृती तयार केली.
साधारणपणे फटाके वाजविणे, फराळाचा आस्वाद घेणे, पाहुणचार घेणे व सुट्टीतील थोडा फार अभ्यास करणे, अशा गोष्टी ठरल्याप्रमाणे मुले करतच असतात. परंतु, यापेक्षा वेगळे काही करावे अशा विचारांनी येथील मुलांनी शिवरायांवरील प्रेम व गड किल्ल्यांच्या बांधकामाविषयी थोडे ज्ञान व श्रमयुक्त आनंद मिळावा, म्हणून गणपती मंदिर आवारात आठ दिवस मेहनत करून सिंहगड किल्ल्याची सुंदर अशी प्रतिकृती तयार केली.
यासाठी दगड, माती, मावळे, राहूट्या, दरवाजे, झेंडे यांचा योग्य वापर करून तयार झालेला किल्ला सर्वांचेच आकर्षण ठरला आहे.
यासाठी उत्साहाने रोशन पाष्टे, गौरव पाष्टे, कौस्तुभ विलणकर, सुजल वनये, आयुष मेस्त्री, कार्तिक विलणकर, अभी मेस्त्री, जिग्नेश पाष्टे, मयुरेश पाष्टे, सानिका वनये, शर्वरी काकवळ, अमित सपकाळ, रोहन पाष्टे, जितेंद्र काकवळ, वृषभ साळुंके यांनी सुधीर पाष्टे व सीताराम करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा किल्ला पूर्ण केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 02/Nov/2024














